Posts

विजयस्तंभाला अभिवादन करण्यात नेत्यांमध्ये प्रकाश आंबेडकर प्रथम

Image
पुणे : भारीप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज नेत्यांमध्ये सर्वात प्रथम येऊन कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन केले. सकाळी सात वाजताच येऊन त्यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले. आंबेडकर यांची येेथे सभा घेण्याची प्रथा नाही. त्यामुळे त्यांची सभा होणार नाही. मात्र इतर पाच नेत्यांच्या या ठिकाणी सभा होणार आहेत. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी जमली आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे दाखल झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. तसेच प्रशासनानेही नागरी व्यवस्था पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. आंबेडकर यांनी लोकांच्या एकत्र येण्याचे या वेळ कौतुक केले. `सरकारनामा`शी बोलताना त्यांनी सांगितले की लोक एकत्र आहेत. गावकऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलेलं जे गेल्या वेळी घडलं, ते पुन्हा घडणार नाही. मात्र गावकऱ्यांचा मान सरकारने राखला पाहिजे होता, तो राखलेला नाही. मागच्यावेळी जे घडलं ते बाहेरच्या लोकांनी येऊन घडवलं ज्यांनी मागच्या वेळी येऊन घडवलं त्यांना नोटिसा दिल्या नाहीत. मराठा समाज आणि ओबीसी समाजात दंगल

भीमा कोरेगावला जाणारच - प्रकाश आंबेडकर

Image
भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला आम्ही जाणार असून आम्हाला कोणी रोखू शकणार नाहीत, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिला. भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला कुणाला सभा घेता येणार नाही, या सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या विधानावर ते म्हणाले, तो बिनडोक आहे़ तो कधी तेथे गेला नाही़ त्यामुळे त्याला भीमा कोरेगाव येथील परिस्थिती माहिती नाही़ संसदेत कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिले असते तर ते न्यायालयात टिकले असते़ मात्र राज्य सरकारने मनमानी पद्धतीने आरक्षण देऊन मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावले आहे़ निवडणुकीतून याची कटूता नक्कीच बाहेर पडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. रामदास आठवलेंनी पाच कोटी द्यावेत रामदास आठवले यांनी लवकरच सर्वांच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा होतील, असे विधान केले होते. त्यावर आंबेडकरांनी १५ लाख रुपये देण्यापेक्षा आठवलेंनी आपल्याला पाच कोटी रुपये दिले तर किमान निवडणुकीचा खर्च निघेल, असा टोला लगावला. loading...

भिडे-एकबोटेंंना पुणे आणि पुण्या जवळील पाच जिल्ह्यात तडीपार करा : भीम आर्मी

Image
भीमा कोरेगाव येथील विजयाला २०१ वर्ष पूर्ण होत असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन केले  जाणार आहे. यावर्षी भीम आर्मी कडून भिमाकोरे येथे भीमा कोरे गाव संघर्ष महासभा आयोजित करण्यात येणार आहे या सभेत चंद्रशेखर हे उपस्थित राहणार आहे आणि या सभेला संबोधित करणार आहे. भीमा कोरेगाव येथील विजयाला २०१ वर्ष पूर्ण होत असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन केले  जाणार आहे. यावर्षी भीम आर्मी कडून भिमाकोरे येथे भीमा कोरे गाव संघर्ष महासभा आयोजित करण्यात येणार आहे या सभेत चंद्रशेखर हे उपस्थित राहणार आहे आणि या सभेला संबोधित करणार आहे. loading... या सभेचे आयोजन तीस डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या कारणा मुळे  मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे या दोघांना पुणे आणि शेजारच्या पाच जिल्ह्यात जिल्हाबंदी करावी अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. मागील वर्षी कोरेगाव भीमा इथे जी दंगल उसळली होती त्या दंगलीला कारणीभूत हे दोघेच असल्याचा आरोप देखील भीम आर्मीने केला आहे. दरम्यान,दुसऱ्या बाजूला एल्गार परिषदेनंतर भीमा-कोरेगांव इथे उसळलेली दंगल लक्षात घेता भीम आर्मीच्या

#नक्की_वाचा रामदास आठवले यांना आंबेडकरी कार्यकर्त्याचे खुले पत्र.....

Image
आठवले साहेब क्रांतिकारी जयभीम,माझं नाव प्रतिक गायकवाड मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा सदस्य नाही मी एक आंबेडकरी कार्यकर्ता आणि स्वतःला भारतीय म्हणणारा आहे.तुमच्यावरलील झालेल्या भ्याड हल्याचा मी निषेधच करीन,कारण की ही कृती असैविधानिक आणि विकृत आहे. मला आठवतंय २००७ २००८ मी T-Series या या नामांकित कंपनीत As Editor म्हणून काम करत असताना २ वेळेस तुमचा शूट मी स्वतः केलाय. आनंद शिंदे,मिलिंद शिंदे यांच्या गाण्यांच्या अगोदर तुमचं मत आणि विचार तुम्ही मांडायचे आणि त्या वेळेस मी तुम्हाला भेटून प्रचंड आनंदित होतो. मला आठवत की शूट चालू असताना “नास्ता” ब्रेक मध्ये “चहा” आला होता आणि कप टपरी वरच्या चहा वाल्या सारखा ग्लास होता आणि आमची धडपड सुरु होती आरे ग्लास तरी चांगला आणा म्हणून…त्या वेळेस तुम्ही म्हणाला होतात आरे दे त्याच ग्लासात आणि तुम्ही चहा त्याच टपरीवरच्या चहाच्या ग्लासात पिलात. मनाला खूप बरं वाटलं होता की क्या बात हे हाच आपला तळागाळातील नेता…तेव्हा माझा वय साधारण १८ १९ वर्षाचा होतो. कालांतराने जस जस वाचत शिकत गेलो तसं तसं सर्व गोष्टी कळायला लागल्या….मान्य आहे तुम्ही BJP सोब

चंद्रशेखर आझाद प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

Image
उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात आझाद यांच्या सलग चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईसहमहाराष्ट्रात आझाद यांच्या सलग चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. आझाद यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये प्रदेश,राज्यस्थान,छत्तीसगड या राज्यांत भाजपाची झालेली पिछेहाट म्हणजे भाजपासाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. आझाद यांना ऐकण्यासाठी राज्यातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने मुंबईतील सभेला येईल असा दावा भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे  यांनी केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील त्या घटनेमुळे तेथील योगी सरकारने त्याच्यावर अन्यायकारक रासुका कायद्यानूसार कारवाही केली. सलग 16 महिने कारागृहात असलेल्या चंद्रशेखर आझाद यांच

‘आठवले यांचे वक्तव्य म्हणजे डिसेंबरमध्ये ‘एप्रिल फुल’ करण्याचा प्रकार’

Image
१५ लाख विसरा, यांच्या शासन काळात आता आपल्या खिशातील पैसाही वाचवणे कठीण झाले आहे, असे ट्विट त्याने केले आहे. मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार असल्याच्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्याचा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमारने समाचार घेतला आहे. १५ लाख विसरा या सरकारच्या काळात आपल्या खिशातील पैसे वाचवणेही कठीण आहे. आठवले यांचे वक्तव्य म्हणजे डिसेंबरमध्ये ‘एप्रिल फुल’ करण्यासारखे आहे, असा टोला त्याने लगावला आहे. सोमवारी (दि.१७) सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी मोदी सरकार प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार असल्याचे म्हटले होते. एवढी मोठी रक्कम सरकारकडे नाहीये, त्यासाठी आरबीआयकडे पैसेही मागितले पण त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे हे पैसे एकत्र टाकले जाणार नाहीत. टप्प्याटप्प्याने हे पैसे टाकले जातील. रिझर्व्ह बँकेशी याबाबतची बोलणी सुरु असून लवकरच पैसे जमा होतील असे आश्वासन आठवले यांनी दिले होते. इसे कहते हैं दिसंबर में अप्रैल फूल बनाना। कहाँ विदेशों से काला धन वापस लाकर 15 लाख देने की बात थी, अ

महाआघाडीला हादरा कॉंग्रेस, बसपा आणि सपा वेगळे ?

Image
 लोकसभा निवडणुकीत आघाडी करून भारतीय जनता पक्षाला कडवे आव्हान देण्याचा काँग्रेसच्या प्रयत्नांना हादरा बसला असून, उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र येणार आहेत. तसेच ते राष्ट्रीय जनता दलालाही त्यांच्या आघाडीत सामील करून घेणार आहेत.  लोकसभा निवडणुकीत आघाडी करून भारतीय जनता पक्षाला कडवे आव्हान देण्याचा काँग्रेसच्या प्रयत्नांना हादरा बसला असून, उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र येणार आहेत. तसेच ते राष्ट्रीय जनता दलालाही त्यांच्या आघाडीत सामील करून घेणार आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये बसपा, सपा आणि राष्ट्रीय जनता दलाने महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचे सूत्र देखील ठरले आहे. बसपा 38, समाजवादी पक्ष 37 आणि राष्ट्रीय जनता दल 3 जागा लढवणार आहे. तर रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघात काँग्रेसविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अद्याप बसपा, सपा किंवा काँग्रेस नेत्यांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. काँग्रेससाठी रायब